Devendra Gayakwad – Cameraman

मित्राच्या वाढदिवसाला कुणी आवडत्या वस्तू, कपडे, केक, फुले, भेटकार्ड देतं, तर कुणी सरप्राईज पार्टी. पण जर कुणी आपल्या मित्राला वाढदिवसाला चक्क सुपरस्टार सोबत सिनेमात एक भूमिकाच गिफ्ट दिली तर? हो, असेच एक सरप्राईज दबंग गिफ्ट प्रसिद्ध कॅमेरामन महेश लिमये यांनी आपला मित्र अभिनेता देवेंद्र गायकवाड याला दिले आहे.

महेश लिमये सुपरस्टार सलमान खानच्या दबंग ३चे कॅमेरामन आहेत. दिनांक २६ ऑगस्ट रोजी देवेंद्र गायकवाड यांचा वाढदिवस होता. महेश लिमये यांनी पुण्याजवळील फलटण येथून दबंग ३च्या शुटींग सेटवरून देवेंद्र गायकवाड याला फोन करून फलटणला बोलावून घेतले आणि त्याला वाढदिवसाचे सरप्राईज गिफ्ट म्हणून चक्क दबंग ३मध्ये एक छोटी भूमिका दिली.

देवेंद्रने छोट्याश्या भूमिकेत केलेल्या अभिनयाचे दिग्दर्शक प्रभू देवा, सुपरस्टार सलमान खान आणि संपूर्ण युनिटने कौतुक केले आणि त्याला वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. देवेंद्र गायकवाड यांनी यापूर्वी मुळशी पॅटर्न’, ‘बबन’, ‘देऊळ बंद’, ‘एक हजाराची नोट’, ‘किल्ला’, ‘रेगे’, ‘मंगलाष्टक – वन्स मोर’ ‘सलामइ. चित्रपटांमध्ये तसेच तुझं माझं जमेना, बेधुंद मनाच्या लहरी, पिंपळपान अशा अनेक मालिका आणि अनेक प्रायोगिक आणिमाकडाच्या हाती शॅम्पेनसारख्या व्यावसायिक नाटकांत भूमिका साकारल्या आहेत. २००४ साली देवेंद्रच्या देता का करंडकया एकांकिकेला पुरुषोत्तम करंडक मिळाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here